भाजपात प्रवेश करणार का? एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण

मुंबई | राष्ट्रवादीचे (NCP) विधान परिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना फोन केल्याची माहिती आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत खडसे यांचे बोलणे झाल्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश करणार का, यावर आता चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे.

मी अमित शहांची भेट घेतलेली नाही. किंवा मी त्यांना फोन केला नाही. माझी त्यांच्यासोबत फोनवर कोणतीही चर्चा झाली नाही. मी त्यांच्यासोबत काही व्यक्तीगत कारणानिमित्त चर्चा केली आहे, असे खडसे म्हणाले.

तसेच अमित शहा यांची भेट घेणार आहे त्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) माहिती दिली होती, असे देखील खडसे म्हणाले. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर असलेले आरोप फेटाळले आहेत.

भारतीय जनता पक्षात (BJP) असताना, मी अनेक वर्षे मेहनतीने काम केले. मात्र भाजपमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाली. अनेक खोट्या केसेस माझ्यावर टाकल्या गेल्याने मी भाजप सोडली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला सन्मानाने आमदारकी दिली. भाजपमधून मी बाहेर गेलो होतो, पण मला राष्ट्रवादीने मोठी मदत केली त्यामुळे मी राष्ट्रवादी त्याग करण्याचा प्रश्नच येत नाही, असे खडसे म्हणाले.

यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पावर देखील भाष्य केले. वेदांता फॉक्सकॉन हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अक्षम आहेत, असे देखील एकनाथ खडसे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा; वाचा सविस्तर वृत्त

मुस्लिम नेत्यांच्या मोहन भागवत भेटीवर असदुद्दीन ओवेसी संतापले; म्हणाले, हे सर्व मुसलमान उच्चभ्रु …

व्हॉट्सअ‌ॅप आणि फेसबुक कॉलसाठी मोजावे लागणार पैसे; वाचा सविस्तर वृत्त

उच्च न्यायालयाने फटकारल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना पळ काढला; नेमके काय म्हणाले शिंदे?

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मेळावा; राज ठाकरे म्हणाले, मैदानाचा वारसा…