Sharad Pawar : “शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज…”

अमरावती | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे सुर असल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर संजय राऊतांनी देखील गृहखात्याच्या कामकाजावर नाराजी खुलेआम व्यक्त केली होती.

त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली की काय?, असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात होता. अशातच आता काँग्रेसच्या मंत्र्याने केलेल्या वक्तव्यावरून आघाडीतील बिघाडी स्पष्ट होत असल्याचं दिसतंय.

महिला आणि बालविकास मंत्री यथोमती ठाकूर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार साहेब (Sharad Pawar) आपण जर मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळं असलं असतं, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

महाविकास आघाडी ज्यावेळा झाली… यापूर्वी साहेब मुख्यमंत्री होते पण आज काळाची गरज आहे, असं ठाकूर म्हणाल्या आहेत. त्यामुळे यशोमती ठाकूर शिवसेनेवर नाराज असल्याचं पहायला मिळत आहे.

अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या.

दरम्यान, शरद पवार यांच्यासमोर यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

विमानात स्मृती इराणींना महिलेने महागाईवरून विचारले प्रश्न; पाहा विमानात काय काय झालं…

“कोरोना संपलेला नाही, आता तो पुन्हा…”; पंतप्रधान मोदींचा गंभीर इशारा

कीर्तनकार सेक्स व्हिडीओ प्रकरणात तृप्ती देसाई आक्रमक; थेट गृहमंत्र्यांनाच पाठवले व्हिडीओ

“गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही”

“तुम्ही काय हिंदूत्वाचं पेटंट घेतलंय का?”, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर