मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार, महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | देशातील राजकारणात खळबळ उडालेली असताना एक अत्यंत महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड समोर येत आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात शिंजो अबे जखमी झाले आहेत.

एका भाषणादरम्यान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. नारा शहरात हल्ल्याचा हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

गोळीबार झाल्यानंतर शिंजो अबे जागेवरच कोसळले. शिंजो अबे यांच्या शरिरातून रक्तस्त्राव झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

या गोळीबारात शिंजो अबे बेशुद्ध झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, शिंजो अबे यांच्यावरील हल्ल्यानंतर जपानमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी एका संशयित व्यक्तिला याप्रकरणी ताब्यात घेतलं असून या व्यक्तिची कसून चौकशी सुरू आहे. तर या हल्ल्यानंतर पोलीस देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

दरम्यान, या हल्ल्यानंतर जपानमधील राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पोलीस देखील आता सतर्क झाले आहेत. तर शिंजो अबे यांच्या प्रकृतीबाबत अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याने शिंदे गट आक्रमक, सोमय्यांविरोधात फडणवीसांकडे केली तक्रार

एक दुर्घटना अन् शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत पावसाचा तडाखा, प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चेत आलेल्या ‘या’ व्यक्तिला जीवे मारण्याची धमकी

‘सौ दाऊद एक राऊत’, मनसेची संजय राऊतांवर खोचक टीका