उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याने शिंदे गट आक्रमक, सोमय्यांविरोधात फडणवीसांकडे केली तक्रार

मुंबई | शिंदे गटाच्या बंडाळीने महाविकास आघाडी सरकारला चांगलाच धक्का बसला. तीन वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येत तयार झालेलं सरकार शिवसेनेतील बंखोरीमुळे अखेर कोसळलं.

महाविकास आघाडीच्या काळात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तत्कालिन सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत सरकारला अक्षरश: धारेवर धरलं होतं.

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं व एकनाथ शिंदेंच सरकार सत्तेत आलं. मात्र, शिंदे गटातील आमदारांनी सोमय्यांविरोधात नाराजी दर्शवली असून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे.

किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली. यानंतर सोमय्यांनी या भेटीचा फोटो ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटविल्याबद्दल अभिनंदन केले, असं ट्विट सोमय्यांनी केलं. मात्र, या ट्विटमधील माफिया शब्दावर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सोमय्यांच्या ट्विटवर नाराजी दर्शवली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल कळवले असल्याचं देखील केसरकर म्हणाले. तर सोमय्या मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईत आल्यावर पार पडलेल्या भाजप व शिंदे गटाच्या संयुक्त बैठकीतच आमच्या नेत्यांवर किंवा उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य करण्यात येऊ नये, अशी विनंती केली होती आणि त्यावेळी फडणवीसांनी ती विनंती मान्य केली होती. त्यामुळे फडणवीस भाजपचे नेते असल्याने ते सोमय्यांशी बोलतील, असंही केसरकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

एक दुर्घटना अन् शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत पावसाचा तडाखा, प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चेत आलेल्या ‘या’ व्यक्तिला जीवे मारण्याची धमकी

‘सौ दाऊद एक राऊत’, मनसेची संजय राऊतांवर खोचक टीका

शिवसेनेला आणखी एक धक्का! ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईत देखील खिंडार