‘गाफिल राहू नका, नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश

मुंबई | एकनाथ शिंदेच्या बंडाळीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला.

आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे नगरसेवक देखील मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील होत आहेत. त्यात शिवसेनेचे 12 खासदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंचं टेंशन अधिकच वाढलं आहे.

खरी शिवसेना आमचीच आहे म्हणत शिंदे गटाने शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील दावा ठोकला आहे. राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आता गाफिल न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचवण्यासाठी कंबर कसा, असे निर्देश उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. तर कायद्याने जो लढा द्यायचा आहे तो देऊच पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तर गाफिल राहू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केले आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेतून मोठी गळती सुरू आहे. त्यामुळे पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरले असून आता त्यांनी शिवसेना भवनात भेटींचा सिलसिला सुरू केला आहे.

दरम्यान, शिवसेनेने 16 आमदारांवर केलेल्या अपात्रतेच्या कारवाईवर 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार, महत्त्वाची माहिती समोर

उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याने शिंदे गट आक्रमक, सोमय्यांविरोधात फडणवीसांकडे केली तक्रार

एक दुर्घटना अन् शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत पावसाचा तडाखा, प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चेत आलेल्या ‘या’ व्यक्तिला जीवे मारण्याची धमकी