अमरावती | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे समर्थक आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे रविवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी आणि बहीण होती.
त्यांनी देवदर्शन घेतले आणि तेथून ते बाहेर पडून परतत असताना, काही तरुणांनी त्यांच्या गाड्यांवर हल्ला केला. यावेळी उपस्थित हल्लेखोर तरुणांनी ‘आला रे आला गद्दार आला’, ‘50 खोरे एकदम ओके’, अशा घोषणा दिल्या.
यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी बांगर यांच्या गाड्यांच्या ताफ्यांनी तेथून पळ काढला. त्यावर त्यांनी मागाहून संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अमरावती दौऱ्यावर आल्यावर आम्ही मी, माझी पत्नी आणि बहीण असे आम्ही तिघे देव दर्शनाला गेलो होतो. देवदर्शन करुन बाहेर पडल्यानंतर दहा-पाच लोकांनी नारेबाजी करत आमच्या गाड्यांवर हाताने मारण्याचा प्रयत्न केला,
पण मला वाटते की याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात? समोर येऊन कुणी वार करत असेल, तर त्याला आपण हल्ला म्हणतो, असे संतोष बांगर यांनी सांगितले.
हा चोरटेपणा आहे. पूर्वीच्या काळी डाका (दरोडा) टाकला जायचा. दरोडा कशाला म्हणतात, तर घराच्या पुढे जाऊन फटाका लावायचा आणि सांगायचे की, मी तुमच्या घरावर दरोडा टाकतोय.
हा पूर्वीचा काळ होता. हे म्हणजे चोर प्रकरण झाले. हे मर्दाचे काम नाही. माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसत्या, तर संतोष बांगर काय आहे, हे मी त्यांना सांगितले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया बांगर यांनी दिली.
माझ्या गाडीला कोणी हात जरी लावला, तर त्याला मी सोडणार नाही, असे बांगर यांनी काही दिवसापूर्वी म्हंटले होते. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या –
अब्दुल सत्तारांची उद्धव ठाकरेंवर मोठी टीका; म्हणाले, पुढील दहा जन्म तुमची…
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दहा लाखांचा दंड
“…तर तो भाजपचा निर्णय असेल”; एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर आशिष शेलारांची स्पष्टोक्ती
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला हॉलिवूडमधून पाठिंबा; अभिनेत्याने केले ट्वीट