अत्तरवाल्याकडे सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले, मागवावा लागला कंटेनर

लखनऊ | इन्कम टॅक्स विभागाच्या एका पथकाने कानपूरमधील कन्नौज येथील पियुष जैन या परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर नुकताच छापा टाकला. यावेळी व्यापाऱ्याच्या घरात पैशांचे घबाड सापडलं आहे.

या नोटा इतक्या होत्या, की त्या मोजण्यासाठी मशीन मागवण्याची वेळ आली होती. शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाण्यांवर सुरु असलेल्या छापेमारीत जवळपास 150 कोटी रुपये किमतीच्या नोटा सापडल्याचं बोललं जातं.

पीयूष जैन हे कानपूरच्या कन्नौज येथे राहतात. गुरुवारी त्यांच्या कार्यालय आणि घरी छापे मारण्यात आले. यावेळी त्यांच्या घरातील कपाटांमध्ये नोटा खच्चून भरलेले असंख्य बॉक्स सापडले. या नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या की आयकर विभाला या नोटा मोजण्यासाठी चार मशीन मागवाव्या लागल्या.

आधी आयकर विभागाच्या पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर पथकाला घटनास्थळी नोटा मोजण्याची मशीन मागवावी लागली. त्यामुळे घराबाहेरील पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.

24 तास उलटून गेले तरी कॅश मोजून संपलेली नाही. कॅश नेण्यासाठी आता कंटेनरलाही पाचारण करण्यात आलं आहे. फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले असून रूममधील पैशांचे ढीग पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

जैन हे पान मसाला समूहाचे संस्थापक आहेत. त्यांचा परफ्यूमचाही व्यवसाय आहे. त्यांच्या सात ठिकाणांवर छापेमारी करणअयात आली आहे. या छापेमारीत 150 कोटी रुपयांची अघोषित संपत्तीचा खुलासा झाला आहे. तसेच आयकर विभागाने 90 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

आयकर विभागाने जैन यांच्या कन्नौज येथील घर, कार्यालय, पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेजवर एकसाथ छापेमारी केली. त्याशिवाय मुंबईतील शोरुम आणि कार्यालयावरही छापेमारी केली आहे. त्याशिवाय डीजीजीआयच्या गुजरात आणि मुंबईच्या पथकांनी सकाळी 10 वाजता छापेमारी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारतातील Omicron बाधितांचा धक्कादायक रिपोर्ट समोर, ‘कोरोना लस घेतलेल्यांनाच…’ 

“अभिनेत्यानं माझं चुंबन घेतलं अन् माझ्या स्तनांना…”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

 दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…

‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा

 रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा