नवी दिल्ली | आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नितीश कुमारांच्या हल्ल्यावरुन सध्या देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेनं सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे.
नितीश कुमार यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ल्याचा प्रयत्न केला असून बिहारमधील बख्तियारपूर येथे ही घटना घडली आहे.
नितीश कुमार एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते. यादरम्यान ते एका मूर्तीला हार घालण्यासाठी पुढे गेले असता त्याचवेळी जमावातील एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला.
या घटनेत नितीश कुमार यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे सध्या ते ठीक आहेत. मात्र या घटनेनं खळबळ उडालेली आहे.
अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचं सांगण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ –
अब देखिए मुक्का वाला LIVE वीडियो… शख्स कैसे आया और पीछे से कर दिया हमला ! एक शख्स आराम से आ रहा है और बेधड़क होकर जहां CM माल्यार्पण कर रहे हैं उस स्थान पर पहुंच जाता है… फिर क्या… आगे VIDEO देखें. pic.twitter.com/dEr8PF2xJr
— Prakash Kumar (@kumarprakash4u) March 27, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022 : दिल्लीचा मुंबईवर दिमाखदार विजय
पुढील 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा
“संजय राऊतांनी केलेली माझी चेष्टा अंगावर येणार आहे, आता खूप काहीतरी…”
“राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत”