मुंबई | अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोपांची मालिकाच लावली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं कौतुक केलं आहे.
नवाब मलिक यांनी कालही पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा बाजार सुरु झाल्याचा आरोप मलिकांनी केला होता.
देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी फडणवीसांवर मुन्ना यादव, रियाझ भाटी यांच्यावरुन फडणविसांवर गंभीर आरोप केले आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं गुड गोईंग अशा शब्दात कौतुक केल्याची माहिती मिळत आहे. आता यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.
‘गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भांगारवाले आहेत, अशी टीका त्यांनी केलीये.
अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मलिकांनी भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आता तर मलिकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरु केलीय. अशात एकडीकडे मुख्यमंत्र्यांनी मलिकांचं कौतुक केलंय. दुसरीकडे मलिक यांनी आता थांबलं पाहिजे असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज दिल्लीत बोलत होते. कधी कुणाबरोबर फोटो असेल तर तो पुरावा होऊ शकत नाही, असं राऊत म्हणालेत.
निवडणुकीच्या राजकारणासाठी राजकारण कोणत्या थराला गेलेय? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणी तरी कर्त्या नेत्याने हस्तक्षेप केला पाहिजे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. खूप प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ घोषणा
कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात पाचव्या लाटेच्या उद्रेकाने भीतीचं वातावरण
“कंगनाचा वरचा मजला रिकामा, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा”
“संजय राऊत बोलून बोलून दमतात, त्यांना बॉर्नविटा पिण्याची गरज”