आता गोळीनं बरा होणार कोरोना, लवकरच मिळू शकते मंजुरी

नवी दिल्ली | कोरोना महामारीचं सावट जगभरात पसरलं आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे. जगभरात लसीकरण मोहिम राबवल्या जात आहेत. लसीकरणामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला असून कोरोना नियम शिथिल करण्यात आले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी तज्ज्ञांकडून तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे नागरिकांनी अजूनही कोरोना नियमांचे पालन करावे, असं सरकारकडून वारंवार बजावण्यात येत आहे.

कोरोनावर आतापर्यंत बरंच संशोधन करण्यात आलं आहे. कोरोनाचा धोका अजूनही कमी झाला नसल्यामुळे त्यावर उपाययोजना सुुरु आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लस तर आहेच आता यात आणखी एक गोळी समाील होणार आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च मधील कोविड स्ट्रॅटेजी ग्रुपच्या प्रमुखांनी गुरुवारी याविषयी माहिती दिली.

कोरोनावर गोळीच्या स्वरूपातील एक औषध सापडलं आहे. ज्यामुळे हॉस्पिटलायझेशनचा धोका निम्म्यानं कमी झाला. अमेरिकन कंपनी मर्क अँड रिजबॅक बायोथेरप्यूटिक्सनं बनवलेल्या औषधाला मोलनूपीरावीर असं नाव आहे. आता हे लवकरच कोरोनाला रोखण्यासाठी काम करणार आहे.

मोलनूपीरावीर गोळीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली जाण्याची शक्यता आहे. हे औषध घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचा आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी झाला असल्याचं तपासणातून समोर आलं आहे.

आतापर्यंत 700 रुग्णांवर या औषधाच्या वापराचा डेटा सादर करण्यात आला आहे. याशिवाय हे औषध डेल्टा प्लस व्हेरिएंटवरही प्रभावी ठरु शकतं. या औषधाला मान्यता मिळाली तर लस नंतरचं हे पहिलंच औषध असणार आहे. त्यामुळे आता हे औषध किती प्रभावी ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

डॉ. राम विश्वकर्मा यांनी या औषधाला गेम चेंजर असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, अमेरिकन फार्मा कंपनी मर्क 8 भारतीय औषध उत्पादक सिप्ला, डॉ रेड्डी प्रयोगशाळा, सन फार्मा, हेटेरो, ओरोबिंदो फार्मा आणि ऐच्छिक परवाना करार असलेल्या इतर कंपन्यांच्या सहकार्यानं या गोळीच्या उत्पादनावर काम केलं जात आहे.

दरम्यान, कोरोनाच्या आलेल्या दोन्ही लाटेत कोरोनानं जगभरात लाखो लोकांचे बळी घेतले. त्यामुळे सगळीकडे मृत्यूचा तांडवच पहायला मिळाला. कोरोना आटोक्यात येत असतानाच आता पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचं कौतुक करतात”

ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! पाकिस्तानला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश 

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ घोषणा

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात पाचव्या लाटेच्या उद्रेकाने भीतीचं वातावरण

“कंगनाचा वरचा मजला रिकामा, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा”