“हारी बाजी को जितना जिसे आता है वो देवेंद्र कहलाता है”

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला. एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीच्या ठिणगीचा आता वणवा पेटला असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

बहुमत चाचणीची मागणी करणारं पत्र राज्यपालांना देत भाजपने काल महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात अधिकृतपणे उडी घेतली. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.

देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात फडणवीसांनी काल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

सत्तासंघर्षात भाजपने भूमिका स्पष्ट केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. भातखळकरांनी ट्विट करत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

हारी बाजी को जितना जिसे आता है. वो देवेंद्र ही दोस्तो कहलाता है, असं अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले आहेत.

या व्हिडीओसोबत भातखळकरांनी पुन्हा येणार. येणारंच, असं देखील लिहिलं आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांच्या आता अनेक प्रतिक्रिया उमटत असून आता महाराष्ट्रात सत्तापालट होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या बहुमत चाचणी होणार?

आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिंदे गट सरसावला, केली ‘ही’ मोठी घोषणा

संजय राऊत आजपासून बोलणं बंद करणार, स्वतःच सांगितलं कारण…

राज्यपालांनी मारली मेख! पत्रातील ‘हे’ 6 आदेश काढू शकतात ठाकरे सरकारची विकेट

एकनाथ शिंदे अडचणीत, गाड्यांच्या किंमती, शेतजमीन लपवल्याचा आरोप