रिक्षाचालक ते अब्जाधीश रियल इस्टेट किंग; अविनाश भोसलेंची संपत्ती किती?, महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयनं अटक केली आहे. डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती.

अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे.

व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं.

रास्ता पेठ भागात ते भाड्याच्या घरात राहायचे. कालांतरानं त्यांनी रिक्षा भाड्यानं देण्याचा व्यवसाय सुरू केला. भोसलेंची ओळख बांधकाम क्षेत्रात आले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काहींच्या माध्यमातून त्यांना रस्त्याची कंत्राटं मिळू लागली.

दरम्यान, बाणेरमध्ये भोसलेंचा व्हाईट हाऊस बंगला आहे. हाऊसच्या टेरेसवर भोसलेंच्या मालकीचं हेलिकॉप्टरदेखील आहे.

पांढऱ्या रंगाच्या या बंगल्याचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखा आहे. इथंच भोसले यांची तिन्ही हेलिकॉप्टर्स असतात, असं सांगितलं जातं.

रिक्षा व्यवसाय ते स्वत:चं हेलिकॉप्टर हा भोसले यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे अल्पावधीत त्यांना हा प्रवास केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सेक्स वर्क हा एक व्यवसाय, त्यांनाही सन्मानाची वागणूक द्या- सर्वोच्च न्यायालय 

शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका! 

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले… 

मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचा झटका 

सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले