मुंबई | कोरोनाचा हा ओमायक्रोन बी 2 (Omycron B2) हा जो विषाणू सगळीकडं पसरत आहे. या व्हेरियंटची लाट नुकतीच आपल्या देशात येऊन गेली असल्याची माहिती आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
जरी कोरोनाचा नवीन विषाणू आला तरी तो फारसा वेगाने पसरणारा नाही. अशी शक्यता आहेत . मात्र हा विषाणू पसरू नये यासाठीची काळजी आपण घ्यायलाच हवी असं मत डॉ अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केलं आहे.
भारत आणि महाराष्ट्रात साधारण नोव्हेंबर 2021 फेब्रुवारी 2022पर्यत आधी ओमायक्रोन बी ए 1 व बी ए 2 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचे रुग्ण सगळीकडं आढळत होते. या रुग्णांना फारशी बाधा होत नाही बी 2 हा बी1 सारखाच विषाणू आहे, हा विषाणू फार वेगाने पसरतो. मात्र यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
साधारण 70 च्या पुढच्या वयोगटातील लोकांना याचा धोका संभवतो. त्यातही ज्या लोकांचे लसीकरण झालं नाही. त्यांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या विषाणुचा धोका या टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी लसीकरणाचा वेग वाढवायला हवा, असं त्यांनी सांगितलं.
चीन आणि इतर युरोपीय देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता चौथी लाट येण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. जगामधील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीन या हाँगकाँग , दक्षिण कोरिया या देशांमध्ये ही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अमेरिकेतही रुग्णसंख्या वाढली आहे.
युरोपीय देशांमध्ये जर्मनी जपान येथेही कोरोना रुग्ण वाढत आहेत. या सगळ्यामुळे कोरोनाची चौथी लाट (fourth wave of the corona)येईल का अशी भीती निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर”
“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…”
मोठी बातमी! युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांनी केल्या ‘या’ मागण्या
“तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखं वागतायेत”
“देश सध्या चारच लोक चालवत आहेत, दोघं विकतात तर 2 जण खरेदी करतात”