मुंबई | एमआयएमने (MIM) काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. राऊतांनी केलेल्या या टीकेला आता खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार चालतात. मग एमआयएम का नकोय? एवढीच हिंमत असेल तर तुम्हाला मुस्लीम मते नकोयत असं स्पष्ट सांगा, असं आव्हान खासदार जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिवसेनेला दिलं आहे.
स्वबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन चालयचे आहे, असा टोलाही खासदार जलील यांनी लगावला आहे.
तुम्हाला सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कुबड्या लागतात. हिंमत असेल तर काढा त्या दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर, असं आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलंय.
एमआयएम तुम्हाला नको असेल तर आम्ही एकट्याच्या बळावर निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत, त्यामुळे पुन्हा आरोप करू नका, असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं आहे
महत्त्वाच्या बातम्या-
“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…”
मोठी बातमी! युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांनी केल्या ‘या’ मागण्या
“तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखं वागतायेत”
“देश सध्या चारच लोक चालवत आहेत, दोघं विकतात तर 2 जण खरेदी करतात”
भाजपला पराभूत करण्यासाठी एमआयएमचा मोठा डाव, आता…