“फडणवीसांना आणि त्यांच्या पत्नीला घाणेरड्या शिव्या देणारे आज का बरं चवताळले आहेत?”

मुंबई |  भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे. पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीत वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पडळकर प्रकरणावर तिरकस ट्विट करून राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना व त्यांच्या पत्नींला घाणेरड्या शिव्या देणारे आज का बरं चवताळले आहेत?, असं ट्विट अवधूत वाघ यांनी केलं आहे. तसंच हातवारे असा हॅशटॅग वापरून त्यांनी शरद पवार यांना चिमटा घेतला आहे.

पडळकर यांची थेट बाजू न घेता वाघ यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे भाजपने मात्र पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर असं बोलायला नको होतं, असं म्हटलेलं आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी देखील पडळकरांची बाजू घेणं टाळलं असलं तरी राष्ट्रवादीवर त्यांनी कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, “मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले बोलले आहेत.. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्याच्या कोण अंगावर जाणार असेल तर लक्षात ठेवा… जशास तसे उत्तर देऊ”

 

-सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता… धनंजय मुंडेंची पडळकरांवर टीका

-बिरोबाची शपथ घेऊन बाप बदलणारी औलाद…. राष्ट्रवादीचं जशास तसं प्रत्युत्तर