“…तर मी नाक घासून चंद्रकांत पाटलांची माफी मागेल”

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) कालपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाचा कालचा दिवस भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलेल्या नक्कलवरून गाजला होता.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गैरहजर होते. त्यावरून विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका करण्यास सुरूवात केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

आजारपण हे नैसर्गिक आहे. आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? आपली ती संस्कृती आहे का?, असे सवाल आव्हाडांनी उपस्थित केले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आव्हाडांवर आरोप केले होते.

जितेंद्र आव्हाडांची संस्कृतीच मुळात दुसऱ्यांचा बाप काढण्याची आहे. माझे वडिल गिरणी कामगार होते. त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी माझ्या आईला स्मरून सांगतो. मी चंद्रकांत पाटलांचा बाप काढलाच नाही, असं आव्हाड म्हणाले आहेत.

तसं काही घडलंच नाही. तसं काही झालं असेल तर मी नाक घासून माफी मागेल, असं म्हणत आव्हाडांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

मी काय बोललो ते महाराष्ट्राला ठाऊक आहे. मी तसं बोललो असेल तर पुराव्यानिशी दाखवा, असं म्हणत आव्हाडांनी खुलं आव्हान दिलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद आता चांगलाच उफाळताना दिसत आहे. आव्हाडांच्या आव्हानावर आता चंद्रकांत पाटील काय उत्तर देतात, यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, फडणवीस म्हणाले ‘मी स्वत: कर्नाटकात जातो अन्…’

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ 

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर? 

‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं 

Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर