मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी आता नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.
शिवशक्ती सेना असं त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे. काही मंत्र्यांच्या बायकांनीही माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.
करुणा मुंडे यांनी आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणं, गोरगरीबांवरील अन्याय दूर करणं या उद्देशाने या पक्षाची स्थापना करण्यात येत आहे, असं करूणा मुंडे यांनी सांगितलं आहे.
गेल्या 25 वर्षांपासून आपण अनेक यातना सहन केल्या आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
वेळ पडली तर आपण बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे यांच्याविरुद्धही निवडणूक लढण्यास मागेपुढे पाहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
मी हा पक्ष जनतेकडून देणगी गोळा करून सुरू करणार आहे. या पक्षात समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थान असेल. समाजकारण करताना मला सत्तेत असणं गरजेचं वाटलं. त्यामुळे मी स्वतःचा पक्ष स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. घरात आपण राजकारण पाहिलं आहे. पोलिसांचा वापर कसा होतो मी पाहिलं आहे, असंही करूणा शर्मा यांनी सांगितलं आहे.
सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. फक्त पोलिसांना बळी दिलं जातं आहे. याची उदाहरणे परमवीर सिंह, वानखेडे यांना भोगावं लागलं आहे. समीर वानखेडे सारख्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे. दुसरीकडे अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचं बोललं जातं, त्यांच्याबद्दल काहीच होत नाही. त्यामुळे आता मी माझं जीवन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असं करूणा शर्मा म्हणाल्यात.
राज्यातील जनतेला आवाहन आहे की एकत्र या, मी एक नवी सुरुवात करत आहे. चांगल्या लोकांचा पक्ष काढू, यामध्ये माझ्या पतीलासुद्धा स्थान देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, फडणवीस म्हणाले ‘मी स्वत: कर्नाटकात जातो अन्…’
आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ
शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?
‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं
Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर