मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामायणातील मंथरेसारखे; हनुमान गढी महंतांची टीका

अयोध्या | मंथरेने श्री राम यांना वनवासात पाठवून शुभकार्यात अडचणी आणल्या होत्या. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे भूमीपूजनाच्या कामात खोड्या घालत असल्याची टीका अयोध्येतील हनुमान गढीचे महंत प्रेमदास यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करू दाखवतात. मात्र चांगल्या कामांमध्ये अनेकदा विघ्न येतात. विघ्न येणं हे केवळ आताचं नसून पूर्वीपासून चालत आलेलं आहे. रामायणाच्या वेळी देखील मंथरामुळे वनवास भोगावा लागला. मात्र 14 वर्षांनंतर राम येऊन गादीवर बसलेच. त्याचप्रमाणे आता देखील मंथराप्रमाणे काही लोकं त्याचं काम करतील. मात्र चांगलं काम होतच राहील, असं त्यांनी स्पष्टीकरण देत महंत प्रेमदासांनी टीका केली आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याला बोलावलं नाही. फ्कत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एकमेव मुख्यमंत्री उपस्थित असणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ही भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचं महंत प्रेमदास यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली प्रतिक्रिया मांडताना ह्या पत्रकाराला चर्चेत राहण्याची सवय असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध असे उदगार काढले आहेत. त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करेल, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण; राहुल गांधी म्हणाले…

कौतूकास्पद! सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठी गौतम गंभीरने उचललं मोठं पाऊल!

बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच राजकीय षडयंत्र- जितेंद्र आव्हाड

‘तो क्षण जेव्हा मी त्याला हो म्हणाले..’; सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केली गोड आठवण

राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलं आहे; भाजपच्या ‘या’ खासदाराचा घरचा आहेर!