आयुर्वेदिक जायफळाचे ‘हे’ आहेत अनेक गुणकारी फायदे

अनेक विकारांवर केल्या जाणाऱ्या घरगुती उपचारांमध्ये जायफळाचा उपयोग फार जुन्या काळापासून चालत आला आहे. जायफळ हे फक्त स्वादासाठी नाही तर त्याच्या औषधीय गुणांसाठीदेखील तितकंच प्रसिद्ध आहे. जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं. जायफळामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. त्यामुळे जायफळ खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

1. हवामान बदलल्यामुळे झालेल्या सर्दी-खोकल्यावर उपचार म्हणून एक कप गरम पाण्यामध्ये पाव चमचा जायफळ पावडर घालून याचे सेवन केल्यास गुण येतो. तसेच पाव चमचा जायफळ पूड चहामध्ये घालून प्यायल्यासही सर्दी-खोकल्यामध्ये चांगला गुण येतो. मात्र जायफळ प्रकृतीने उष्ण असल्याने ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता अधिक असते, त्यांनी जायफळाचे सेवन कमी प्रमाणात करावे.

2. जायफळ आणि जायफळाच्या तेलाचा उपयोग हा पचनक्रियेसंबंधित आजारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो.

3. जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्याचं ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं. डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.

4. आयुर्वेदानुसार जायफळ अनेक विकारांवर गुणकारी आहे. अपचन, गॅसेसमुळे पोट फुगल्यास किंवा पचनासंबंधी इतर तक्रारी असल्यास दोन मोठे चमचे जायफळाची पूड आणि पाव चमचा सुंठ पूड एकत्र करावे. भोजन करण्याच्या अर्धा तास आधी या मिश्रणातील 1/8 चमचा पावडर गरम पाण्यासोबत सेवन करावी. तसेच ज्यांना अपचनाचा त्रास वारंवार होत असेल त्यांनी एक कप उकळत्या पाण्यामध्ये तीन वेलदोडे, पाव चमचा सुंठ पूड आणि एक चिमुटभर जायफळाची पूड घालून हे मिश्रण चांगले उकळावे आणि या काढ्याचे सेवन करावे.

5. खाण्यामध्ये स्वाद आणण्याव्यतिरिक्त जायफळामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे तुमच्या त्वचेशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लेमेट्री गुणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांना थांबवण्यासाठी मदत होते.

6. जायफळ पाचनक्रिया चांगली करतं. दररोज जेवल्यानंतर जायफळ तुकड्याच्या रूपात किंवा पावडर करून त्याचा वापर करावा. पोटाच्या समस्या दुरुस्त करण्यासाठी पाचन क्षमता वाढविण्याचं काम जायफळ करतं.

7. जायफळामध्ये असे अनेक गुण असतात जे प्रत्येक माणसाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जायफळात बरीच पोषक तत्व असतात तसंच त्यामध्ये अँटीऑक्सीडंट, विटामिन्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुण, फायबर आणि मिनरल्सदेखील असतात. जे आपल्या शरीरा स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

8. जायफळामध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचेही गुण असतात. अनेक वेळा गळ्याजवळ व्हायरस किंवा बॅक्टेरिया चिटकून राहतात आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.

महत्वाच्या बातम्या – 

“परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना कटकारस्थान…

मिताली मयेकरच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा…

जाणून घ्या! उन्हाळ्यात दही भात खाण्याचे ‘हे’…

विरुष्कासह वामिकाचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल…

सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिर खानच्या मुलीनं दिली…