कंगना रणौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘या’ चित्रपटांसाठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई| 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. खरतर हा सोहळा गेल्या वर्षी मे महिन्यात होणं अपेक्षित होतं मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लाॅकडाऊन करण्यात आल्यानं हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. 22 मार्च रोजी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. अशातच अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-2020’ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री कंगना रणौत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंगा आणि मणिकर्णिका या चित्रपटात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान कंगनाचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांनी कंगनावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

वर्षभरात प्रदर्शित झालेल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मनोरंजन सृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. कंगना राणौतला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी तिला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

कंगनाला 2008 साली मधुर भंडारकर दिग्दर्शित फॅशन चित्रपटासाठी सर्वोत्तमच सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच 2014 साली क्वीन तर 2015 साली तन्नू वेड्स मन्नू चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला. त्याचप्रमाणे तिला 2006 च्या गँगस्टर चित्रपटासाठी पदार्पण करणारी सर्वोत्त अभिनेत्री या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. आता चौथ्यांदा तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

कंगनाला भारत सरकारने पद्मश्री हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान देऊनही यापूर्वीच गौरवलं आहे.  कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी कंगनाला भारत सरकारने हा पुरस्कार प्रदान केलाय.

दरम्यान, बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत तिच्या अभिनय कौशल्याबरोबरच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. ती कधीही कोणत्याही विषयावर उघडपणे बोलण्यात कचरत नाही.

 

महत्वाच्या बातम्या – 

आयुर्वेदिक जायफळाचे ‘हे’ आहेत अनेक गुणकारी फायदे

“परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना कटकारस्थान…

मिताली मयेकरच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा…

जाणून घ्या! उन्हाळ्यात दही भात खाण्याचे ‘हे’…

विरुष्कासह वामिकाचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल…