मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावर चांगलच तापलेलं पाहायला मिळतं आहे.
परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन राज्यात जो वाद सुरु झाला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
कटकारस्थान करुन परमबीर सिंह यांनी महाविकास आघाडी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची चौकशी होईलच आणि त्या दृष्टीने कारवाई देखील केली जाईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पदाचा राजीनामा तूर्तास घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
परमबीर सिंह यांना 17 मार्चला बदली होणार हे माहित असताना 16 मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनूसार अनिल देशमुख हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सचिन वाझे यांना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यावेळी अनिल देशमुख विदर्भ दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना रोगाची लागण झाली. त्यामुळे ते 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असताना पुरावा तयार करुन कटकारस्थान करत बदनाम करण्याचा प्रयत्न होता, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
तसेच नवाब मिलिक यांनी परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बवर एक मोठं वक्तव्य केलं आहे. परमबीर सिंह दिल्लीत कोणाला भेटत होते. याची माहिती आमच्याकडे असून, वेळ आल्यावर ती उघड केली जाईल, असा दावा देखील नवाब मलिक यांनी केला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे परमबीर सिंह यांचा बोलताधनी कोणी आहे का?, असा सवाल केला जात आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशमुखांचा राजीनामा घेणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अनिल देशमुख हे 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयात भरती होते. याची माहिती मी स्वत: रुग्णालयातून घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच परमबीर सिंह यांनी केलेल्या आ.रोपांमधी कोणतंही तथ्य नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्धवत नसल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
विरुष्कासह वामिकाचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल…
सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिर खानच्या मुलीनं दिली
‘राष्ट्रपती लागवट लागू करा’ असं म्हणाऱ्यांवर…