जाणून घ्या दररोज अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ड्रायफ्रुट्स तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. ड्रायफ्रुट्स मध्ये प्रामुख्याणे वापरला जाणारा अक्रोड शरीरासाठी आरोग्यदायी असतो. अक्रोडाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला असतो. अक्रोड केक, चॉकलेट, कुकीज, लाडू, मसाले दूध, आईस्क्रिममध्ये केला जातो. अक्रोडामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते. याशिवाय अक्रोडामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत.

अक्रोडमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे समाविष्ठ असतात. त्यात व्हिटामिन बीची सर्वाधिक मात्रा आहे, जी चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि गडद डाग कमी करण्यास मदत करते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते.

अक्रोड पूर्णपणे वाळवून त्याची पेस्ट करून ती भाजून मग त्यापासून तेल काढलं जातं. ते सुंदर तपकिरी रंगाचं असतं. या तेलात एलॅजिक आम्ल हा अँन्टिऑक्सिडंटस्चा स्त्रोत असतो. यामुळे कर्करोगाला प्रतिबंध होतो. अक्रोडाच्या तेलातील मेलटोनिन, सेलेनियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, जस्त, कॅल्शियम यासारख्या खनिजांमुळे शरीरातील हॉर्मोन्सची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

बदललेल्या जीवनशैलीमुळे वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. अक्रोडमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर रक्तातील साखर वाढत नसल्यामुळे मधुमेहींनी अक्रोड खाण्यास काहीच हरकत नाही.

अक्रोड शरीरासाठी कितीही उपयुक्त असले तरी ते प्रमाणात खाणे गरजेचे आहे. कारण अती प्रमाणात कोणतीही गोष्ट खाण्याने तुम्हाला दुष्पपरिणाम भोगावे लागू शकतात. यासाठीच दिवसभरात मूठभर अथवा 4 ते 5 अक्रोड खाण्यास काहीच हरकत नाही.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ अभिनेत्रीकडे चाहत्यानं केली न्यूड फोटोची मागणी, अभिनेत्रीनं दिला हटके रिप्लाय