गेल्या 70 वर्षात नाही झालं ते येत्या सात ते आठ महिन्यात होणार- राहुल गांधी

नवी दिल्ली | कोरोनामुळे मागील काहा महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे देशातील सर्व उद्योगधंदे बंद होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झालेला पाहता लॉकडाऊन हटवलं असून केंद्राने काही सूचना दिल्या आहेत. त्याच्याप्रमाणे सध्या देशातील काम चालू झाली आहेत. मात्र लॉकडऊमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण आता बेरोजगार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत मोठं संकट येणार असल्याचा इशारा दिला आहे.

सात महिन्यात देशावर बेरोजगारीचं मोठं संकट येणार आहे. गेल्या 70 वर्षात नाही झालं ते येत्या सात ते आठ महिन्यात होणार असल्याचं म्हणत गांधींनी मोदींच्या धोरणांवरही टीका केली आहे. राहुल गांधी यांनी व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं आहे.

छोट्या कंपन्या, शेतकरी, सर्व व्यवस्थाच मोदींनी संपवली आहे. एकामागोमाग एक कंपन्यात बंद होत आहेत. लघु आणि मध्यम उद्योगही कर्जाच्या हफ्ते फेडण्यात मिळालेली सूट संपल्यानंतर नष्ट होतील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे मोठं संकट येणार असल्याचं आधीही मी बोललो होतो. मात्र त्यावेळी मीडियाने माझी खिल्ली उडवली होती. कारण कोरोनामुळे भारत तरूणांना नोकरी देऊ शकणार नाही. तुम्हीच आता सात ते आठ महिन्यानंतर पाहा, असं राहुल गांधींनी सांगितलं.

 

महत्वाच्या बातम्या-

‘…तेव्हा मराठी कलाकार नाही दिसले त्यावेळी दिशा, जॅकलीनस पाहिजे असतात’; राणेंचं जोरदार टीकास्त्र!

“दाभोलकरांना मारण्यात आलं तेव्हा गृहखात राष्ट्रवादीकडेच होतं, तुमच्याच सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला”

ब्रँड इज ब्रँड! ‘क्रिकेट विश्वाच्या इतिहासात तुझं नाव…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहीला पाठवलं खास पत्र

मुंबई पोलिसांना न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर असताना रोखलं हे बरोबर नाही- संजय राऊत

काय सांगता…! कांदा एवढा लाभदायी आहे; सविस्तर वाचा