“शिवसेना आता जनाब शिवसेना झालीये”; फडणवीसांची खोचक टोला

मुंबई | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या महाविकास आघाडीत सामील होण्याच्या वक्तव्यानं राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

जलील यांनी एमआयएम महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. परिणामी वादाला सुरूवात झाली आहे.

महाविकास आघाडीसोबत राज्यात भाजपचा विरोध करण्यास आपण तयार असल्याचंही जलील म्हणाले आहेत. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना आता जनाब शिवसेना झाली आहे, अशी जहरी टीका फडणवीस यांनी केली आहे.

राज्यात शिवसेना दाऊदच्या मदतीला जाणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा देखील घेऊ शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीस यांच्या या टीकेला आता शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न फोल ठरल्यानं असं बोललं जात आहे.

सर्व पर्याय संपल्यानं भाजपची बी टीम असणाऱ्या एमआयएमला मैदानात उतरवण्यात आल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

दरम्यान, एमआयएमशी युती करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं शिवसेना नेते म्हणत आहेत. असं असलं तरी जलील यांच्या वक्तव्यानं शिवसेनेवर प्रचंड टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर” 

“संजय राऊतांचं असं आहे की दिन में बोले जय श्री राम, रात को लेते…” 

मोठी बातमी! युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांनी केल्या ‘या’ मागण्या