‘…अन्यथा आम्ही शेवटच्या 5 मिनिटांत निर्णय घेऊ’; बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई | राज्यमंत्री  कडू हे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरु करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने खरेदी नाही केली तर एका हेक्टरला जार हजार रूपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात, असं ते म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत ऐनवेळी बच्चू कडू काही वेगळी भूमिका घेतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आमचं मतदान भाजपला जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करु, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी पाच जागांवर संबंधित पक्षांचे उमेदवार सहजपणे निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवं वळण; पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ 

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो”

‘लाथ घातल्यानंतर…; शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली! 

“कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना नोकरी मिळणार नाही”