“शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता घरी बसावं”

नाशिक | शरद पवार आणि रोहित पवार यांचा चौडीत यांचा संबंध काय? महत्वाचे म्हणजे शरद पवारांचे आता वय झालंय, त्यांनी घरी बसावं, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमध्ये केली आहे.

कांदा परिषदेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

दोन वर्षापूर्वी विश्वासघातानी आम्ही विरोधी पक्षात बसलो. विरोधीपक्षामध्ये असलो तरी रडत बसलो नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहोत, असं पडळकर म्हणालेत.

इतके वर्ष कांद्याचा प्रश्न का मिटले नाहीत. याच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना गोळ्या घालण्यात आले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या …वर लाथ घाला असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याचंही पडळकर म्हणालेत.

लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील आणि त्यावेळेस त्यांना कांद्याचा वास दाखवा ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असं वादग्रस्त वक्तव्य पडळकर यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवं वळण; पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ 

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो”

‘लाथ घातल्यानंतर…; शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली! 

“कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना नोकरी मिळणार नाही”