सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवं वळण; पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ

नवी दिल्ली | प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला (Siddhu Moosewala) याची रविवारी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली.

पुण्यातील दोन शूटरची नावं समोर आली आहेत. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे. यामध्ये पुण्यातील दोन शूटरचाही समावेश असून संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी त्यांची नावं आहेत.

मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते.

2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले, आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटिव्ही फूटेज पाहून संतोष जाधव याच्याबद्दल माहिती दिली होती.

विक्रमजितसिंह ऊर्फ विकी मिड्डुखेरा याची मागील वर्षी 7 ऑगस्टला हत्या झाली होती. या हत्याप्रकरणात सिद्धूचा मॅनेजर शगुनप्रीतसिंग याचे समोर आलं होतं. त्याने कौशल गँगला सुपारी देत ही हत्या घडवून आणल्याची चर्चा होती.

यानंतर तो ऑस्ट्रेलियाला पळून गेला. या हत्येचा सूड उगवण्यासाठी सिद्धूची हत्या करण्यात आली. हा प्रकार दोन गँगमधील वादातून झाला आहे. यामागे लॉरेन्स बिष्णोई गँग असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो”

‘लाथ घातल्यानंतर…; शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली! 

“कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना नोकरी मिळणार नाही” 

शाळा पुन्हा बंद होणार का?; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती

“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचं कल्याण होत नाही”