मुंबई: विधानसभा अध्यक्ष म्हणून काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सभागृहात बोलताना प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. तुमची नजर माझ्या शेतकऱ्यांवर असली पाहिजे, असं म्हणत त्यांनी अध्यक्षांना इशारा दिला आहे.
अध्यक्षांच्या डोक्यात नेहमी शेतकरी असला पाहिजे. तुमचे कान जरी इकडे असले तरी तुमची नजर शेतकऱ्यांकडे असली पाहिजे. तुमचं लक्ष अपंगांकडे, कष्टकऱ्यांकडे आणि मजुरांकडे असले पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचं प्राधान्य शेतकरी आहेत हे वेळोवेळी दाखवून दिलं आहे. ते अध्यक्ष झाल्याने आता शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
दरम्यान, नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सुरुवातीला भाजपने त्यांच्याविरोधात किसन कथोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शेवटी त्यांनी माघार घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवारांना मिळणार ‘हे’ मंत्रिपद?- https://t.co/UG51KJpUee @AjitPawarSpeaks @ShivSena @NCPspeaks @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
ऐकावं ते नवलचं! जेलमध्ये रेडिओ स्टेशन अन् कैदी बनले रेडिओ जॉकी…- https://t.co/bDfXaaf21O @airnewsalerts @BBCR1 @OYERJALOK
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
ते परत आले पण ‘विरोधी पक्षनेता’ म्हणून- जयंत पाटील-https://t.co/satng0HIUO @Dev_Fadnavis @bjp4mumbai @NCPspeaks @JayantPatilFC @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019