“एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण शरद पवारांच्या मनात काय हे कळणार नाही”

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलं. यावर मंत्री बच्चू कडू यांनी भाष्य केलंय.

समुद्राच्या पाण्याची खोली मोजता येते पण शरद पवारांच्या मनात काय चालले हे गेल्या 50 वर्षात कुणाला ओळखता आलेलं नाही. त्यामुळे त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं यामागे काय राजकारण आहे, हा देखील संशोधनाचा विषय आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

नवाब मलिक, अनिल देशमुख विधानसभेचे सदस्य असतांना न्यायालयाने त्यांना मतदानाला परवानगी दिली नाही, हा निर्णय म्हणजे संशोधनाचा विषय असल्याची टीका देखील बच्चू कडू यांनी केली.

भाजपने ईडीचा दबाव टाकून काही अपक्ष आमदार, आघाडीच्या नेत्यांना मदत करायला भाग पाडले, असा आरोप देखील कडू यांनी केला.

शिवसेनेच्या संजय राऊत यांना 41 मते मिळाली म्हणजेच शिवसेनेने जोखीम पत्करली. पण राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना 42 आणि काॅंग्रेसच्या प्रतापगढी यांना 44 मते मिळाली. म्हणजे अनुक्रमे एक आणि दोन मते अतिरिक्त मिळाली. आपले उमेदवार सुरक्षित करण्यासाठी या दोन पक्षांनी हे पाऊल उचलणं गैर नाही, पण महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी रिस्क घ्यायला हवी होती, पण तसं झालं नाही, असं बच्चू कडू म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर! 

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट! 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

“तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत” 

“106 काय 130 असूद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही”