“…तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील”

मुंबई | आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे, असं शिवसेने आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या भूमिकेबाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आम्ही काय बोलतेय हे या अपक्ष आमदारांनाही माहीत आहे आणि भाजपलाही माहीत आहे, असं राऊत म्हणालेत.

एका निवडणुकीत विजय झाला आणि पराभव झाला म्हणजे अणुबॉम्ब कोसळला किंवा महाप्रलय आला आणि सगळं वाहून गेलं, असं होत नाही. निवडणूक आयोगाला हाताशी धरून कशा प्रकारे खेळ खेळला जात होता, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या भूमिकेबाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, असंही ते म्हणालेत.

पंकजा मुंडे यांची आम्हाला काळजी असणारच. कारण त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचं कौटुंबिक नातं होतं, असं राऊतांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण शरद पवारांच्या मनात काय हे कळणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट! 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

“तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत”