“राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई | मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. ही भेट मुस्लीम संघटनांकडून मनसे नेत्यांना येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

मनसेच्या नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली आहे.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांना धमकीचं पत्र मिळाल्याचं सांगितलं आहे.

माझ्यासोबत राज साहेबांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना सांगताना सांगितलं आहे.

राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

दरम्यान, या धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

महतत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी

सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित 

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर 

“सुदैव आहे तुमचं की तुम्हाला तुरूंगात दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना” 

मोठी बातमी! नवाब मलिक प्रकरणी एनआयएच्या तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा