“बाळासाहेब ठाकरे भोळे होते, पण मी….”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई | भोंग्याच्या भूमिकेवरुन मनसे आणि ठाकरे सरकारमध्ये जोरदार कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे.

आज राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार असून सगळ्यांच्या नजरा आज राज ठाकरेंच्या सभेकडे लागून आहेत.

राज ठाकरेंच्या सभेआधीच राज्यातील वातावरण पेटलं आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंवर सडकून टीका केल्याचं पहायला मिळालं आहे.

ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही, त्यावेळी भाजपने बाळासाहेब ठाकरे यांना वेळोवेळी कसे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे मी नाही म्हटलं तरी थोडासा धुर्तपणे भाजपासोबत वागतो, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मी भोळा नाही. माझे वडील भोळे होते. त्यांनीच माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे, पण हिंदुत्वाच्या आडून भाजप त्यांचे जे डाव साधत होता त्याकडे बाळासाहेब कानाडोळा करत होते, मी तसं करणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे लक्ष देत नाही. असे खेळ खूप पाहिलेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेआधीच टीकास्त्रांची झोड सुरु झाली आहे. त्यामुळे सभेपूर्वी तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं, असा अंदाज आहे.

आज होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार, कोणते नवे मुद्दे मांडणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मास्क सक्तीविषयी राजेश टोपेंचा गंभीर इशारा, म्हणाले…

“अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपवर तुटून पडा आणि आम्ही घरात बसतो” 

“नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं…” 

“राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागलेत” 

“…तेव्हापासून राज माझ्या मागावर होते”, शर्मिला ठाकरेंंनी सांगितला लग्नाआधीचा किस्सा!