मास्क सक्तीविषयी राजेश टोपेंचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगानं जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. वाढता संसर्ग पाहता शिथिल केलेले नियम पुन्हा हटवण्यात येतील, असं दिसत आहे.

कोरोना आटोक्यात येत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठकही घेतली होती. तसंच संबंधित राज्यांना काळजी घेण्यासही सांगतिलं होतं.

रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्क सक्ती करावी लागेल, असं स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडलं आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नागरिकांनी मास्क वापरावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. तसंच भविष्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास मास्क सक्ती करावी लागेल, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

दरम्यान, कोरोना आटोक्यात आल्यानं अनेक ठिकाणचे कोरोना नियम शिथिल करण्यात आले. मात्र आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अद्यापही कोरोनाचा कहर कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपवर तुटून पडा आणि आम्ही घरात बसतो” 

“नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं…” 

“राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागलेत” 

“…तेव्हापासून राज माझ्या मागावर होते”, शर्मिला ठाकरेंंनी सांगितला लग्नाआधीचा किस्सा!