मुंबई | राष्ट्रीय बँकाच्या विलिनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याला बँक अधिकाऱ्यांच्या संघटनांनी विरोध करत संपाचं हत्यार उपसलं होतं. मात्र आता ते शमलं आहे. अर्थसचिवांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर या संघटनांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आहे.
26 आणि 27 सप्टेंबरला संप आणि त्यानंतर आठवडा सुटी त्यालाच जोडून आलेली महात्मा गांधी जयंती यामुळे बँकांचे कामकाज जवळपास 7 दिवस बंद राहणार होते. त्यामुळे सर्वसामन्यांना बँकेचे व्यवहार करता येणार नव्हते. मात्र ही बातमी सर्वांनाच दिलासा देणारी आहे.
10 सरकारी बँकांचे 4 बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्यावर कुऱ्हाड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बँकांचे विलीनीकरण करू नये. ग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी. आरबीआयच्या नियमानुसार निवृत्ती वेतन द्यावं, अशा मागण्या घेऊन या संघाटना घेऊन संप करणार होत्या. मात्र आता तो मागे घेण्यात आला आहे.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कंफडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोशिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिस, या संघटनांनी संप पुकारला होता.
महत्वाच्या बातम्या-
मोदी, स्मृती इराणींसारखं खोटं प्रमाणपत्र देण्याची आमची संस्कृती नाही- सुजात आंबेडकर – https://t.co/Xi8yYkDPun #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
भाजप अध्यक्षांच्या पहिल्याच बैठकीला उदयनराजे भोसलेंची दांडी! – https://t.co/LArZoaYUfo @BJP4Maharashtra @Chh_Udayanraje
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
भाजप अध्यक्षांच्या पहिल्याच बैठकीला उदयनराजे भोसलेंची दांडी! – https://t.co/LArZoaYUfo @BJP4Maharashtra @Chh_Udayanraje
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019