युती सरकारने महाराजांचा अपमान करण्याचं पाप केलंय- अमोल कोल्हे

अलिबाग : भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून केवळ जनतेला फसविण्याचे काम केले नाही, तर महाराजांचा अपमान करण्याचे पाप देखील केलं आहे. मतदार या सरकारला माफ करणार नाही, अशा शब्दात खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. महाड विधानसभा मतदार संघातही माणिक जगताप यांचा आमदार म्हणून राज्याभिषेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या शिवनेरी ते रायगड या शिवस्वराज्य यात्रेचा  समारोप रायगडावर झाला. महाड शहरातील शिवाजी चौकात आघाडीचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

गुजरातमध्ये केवळ पाच वर्षांत चार हजार कोटी रूपये खर्च करून सरदार वल्लभ्भाई पटेल यांचा पुतळा उभा राहीला. महाराष्ट्रात अरबी समुद्रातील शिवस्मारकाची आणि इंदू मीलमधील भारतरत्न डाँँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक वीट देखील उभी राहिलेली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, रायगडचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, आ. संजय कदम, आ. अनिकेत तटकरे, महाडचे माजी आमदार माणिक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-