मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने कोरोनाला रोकण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.
अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्याने आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1193 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
ख्रिसमस, 31st आणि नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे आता राज्य सरकारने गर्दी न करत घरीच कार्यक्रम साजरे करण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यात आज 198 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 450 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ओमिक्राॅन देखील झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय.
गेल्या 4 दिवसांमध्ये राज्यातील रूग्णसंख्या ही दुप्पट झाल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, आज मुंबईत 3 हजार 671 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईत येत्या दोन दिवसात मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
भाजप खासदार म्हणतात,”नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा, लग्न समारंभात…”
नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-
मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
‘…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागेल’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य