काळजी घ्या! कोरोना अजून संपलेला नाही; भारतावर चौथ्या लाटेचं सावट

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे अनेकांचं मोठं नुकसान केलं आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अशातच आता कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.

देशात आता कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट घोंगावत आहे. त्यामुळे काही राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. दैनंदिन रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने आता केंद्राचं टेन्शन वाढलं आहे.

दैनंदिन रुग्णसंख्या वाढताना दिसत असून आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काम करत आहेत. कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे.

मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी महाराष्ट्रासह, हरियाणा केरळ, दिल्ली आणि मणिपूर राज्यांना पत्र लिहित खबरदारीच्या सुचना केल्या होत्या.

देशात कोरोनाच्या नव्या XE व्हेरियंटचा रूग्ण आढळल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली. त्यामुळे आता पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत आढळलेल्या प्रकारापैकी हा व्हेरियंट सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरियंट असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं मत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रणबीर-आलियाचं लग्न तर झालं पण शेजाऱ्यांनी घोळ घातला, प्रकरण पोलिसात गेलं अन्…

राज ठाकरेंच्या भाषणानंतर शरद पवारांना सतावते ‘ही’ चिंता, म्हणाले…

गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं, म्हणाले “शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”

“एकेकाळी माझे पाय धरायचे, ते आता माझ्याविरोधात आणि पवारांवर बोलतात

‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी