सावधान! जर तुम्हालाही ‘या’ सवयी असतील तर तुमची रोगप्रतिकार शक्ती होऊ शकते कमी

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

हा विषाणू शरिरात गेल्यावर त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर होत आहे. त्यामुळे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागली आहे. योगासने, व्यायाम, नियमित आहार घेणे याकडे काळजी पूर्वक लक्ष देऊ लागले आहेत.

परंतू एवढं करूनही आपल्या रोजच्या सवयींमुळे या सगळ्यावर पाणी भिरू शकते. तर आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. जर तुम्ही त्या करत असाल, तर तुमची प्रतिकार शक्ती कमी होण्यास या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.

  • फास्ट फूड- आताच्या मॉर्डन जिवनशैलीमुळे आपल्या सर्वांना बाहेरचे फास्ट फूड पिझ्झा, बर्गर खायची सवय असते. मात्र या फास्ट फूडमध्ये प्रथिने आणि जिवनसत्वांचे प्रमाण अगदी अल्प प्रमाणात असल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते.
  • प्रक्रिया केेलेले खाद्य- प्रक्रिया केलेल्या खद्यामध्ये साखर, मीठ, रिफाइन्ड कार्ब्स आणि प्रिजर्वेटिव्स असतात. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या प्रतिकार शक्तीवर होतो.
  • पांढरा ब्रेड- पांढरा ब्रेड, केक आणि पेस्ट्री यांचाही परिणाम आपल्या प्रतिकार शक्तीवर होतो. तसेच या पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या पदार्थांचे सेवन केल्याने आपलं वजनही वाढते.
  • झोपण्यापूर्वीच्या सवयी-  अनेक लोकांना झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते. परंतू त्याचा थेट परिणाम आपल्या प्रतिकार शक्तीवर होतो. कॉफीमध्ये कॅफेन नावाचा घटक असतो. त्यामुळे आपली झोप उडू शकते.
  • दारू आणि धुम्रपान- दारू आणि धुम्रपान केल्याने त्याचा परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो. आणि अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम आपल्या प्रतिकार शक्तीवर होऊ, आपली प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे दारू आणि धुम्रपान याचे सेवन करू नये.
  • कँडी- अनेकांना जेवन झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं. काही लोक कँडीचेही सेवन करतात. मात्र दररोज कँडी खाल्याने तुमच्या शरिरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-

पुन्हा नव्या डिझाईनमध्ये लाँच होणार ‘ही’ गाडी,…

आता ‘या’ पद्धतीने बदलता येणार फाटक्या नोटा, वाचा…

मोठ्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा चढले; वाचा आजचे…

सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणाऱ्या ‘या’ गाडीची…

कोल्हापुरात भर रस्त्यात राडा! नगराध्यक्षांनीच ग्रामस्थाच्या…