अशाप्रकारे चहा घेत असाल तर सावधान!; होऊ शकतात ‘हे’ अत्यंत गंभीर आजार

सकाळ झाली की बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते. चहाचे मोठ्या प्रमाणावर चाहते आपल्या देशात पहायला मिळतात. चहा पिल्यामुळे मूड फ्रेश होतो.  काम करत असताना कंटाळा आल्यास अनेक लोक चहा पित असतात.  कारण चहा नेहमी सक्रिय ठेवण्यास मदत करतो.  पण सतत चहा पिणे चांगले आहे का?, असा सवाल अनेकदा उपस्थित केला जातो. यासंदर्भात आम्ही तुमच्यासाठी आणलीय एक अत्यंत महत्त्वाची माहिती.

अनेक लोकांना एखाद्या दिवशी चहा न पिल्याने डोके दुखायला लागते. त्यांना त्रासही होतो.  चहा योग्य प्रमाणात पिल्यास शरीरास कोणताही त्रास होत नाही.  मात्र जास्त प्रमाणात चहा पिणे आपल्या शरीराला तसेच मानसिक स्वास्थ्याला हानिकारक ठरु शकते. रिकाम्या पोटी चहा पिल्याने प्रचंड नुकसान होतं. याची तुम्हाला जाणीव आहे का?, अशा प्रकारे चहा पिल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत आहात, असंच म्हणावं लागेल.

जगाचा विचार करता लठ्ठपणा ही सर्वांचीच समस्या बनली आहे. या समस्येला अनेक लोक त्रासलेले आहेत. मात्र ते लोकही त्यांच्या खाण्या-पिण्यामध्ये सवयी अजिबात बदलत नाहीत, तसेच त्यातील अनेकजण रिकाम्या पोटी चहा घेत असल्याचं निदर्शनात आलं आहे.

रिकाम्या पोटी चहा पिणं का हानिकारक आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ते जाणून घेतल्याशिवाय आपल्याला खरं काय ते कळण्यास मदत होऊ शकते. तर आपण रिकाम्या पोटी चहा घेतला की चहात विरघळलेली साखर आपल्या शरीरात जाते आणि तीच आपल्या लठ्ठपणास कारणीभूत ठरते. सारखेचा आणि लठ्ठपणाचा किती जवळचा संबंध आहे हे तर जगजाहीर आहे.

अनेकदा काय होतं, काम करत असताना कंटाळा आला म्हणून आपण चहा पितो. तसेच काहीजण काॅफी पितात, तर यामध्ये जे कॅफीन असतं ते मेंदूला उत्तेजीत करतं. सारख्या चहा किंवा कॉफी पिण्याच्या सवयीमुळे शरिरात कॅफीनचं प्रमाण वाढतं.

जास्त प्रमाणात शरीरात गेलेलं कॅफीन कधीही शरिरासाठी हानीकारकच असतं. या कॅफीनमुळे झोप येत नाही, झोप न आल्याने त्याचा ताण आपल्या शारिरीक तसेच मानसिक स्वास्थ्यावर झालेला पहायला मिळतो. त्यामुळे ताण वाढून आपण उदासीन होऊ शकतो.

अनेकांना गरमागरम कडक चहा प्यायचा छंद असतो. परंतू जास्त गरम चहा पिल्यामुळे पोटाचे आजार उद्भवू शकतात. सकाळी अशा प्रकारे चहा पिल्यास पोटामध्ये जखमा होतात. यामुळे पोटात अल्सरची समस्या देखील उद्भवू शकते, ही पुढे जाऊन आणखी गंभीर स्वरुपाची होऊ शकते.

बरेच लोक सांधेदुखीमुळे त्रस्त असलेले आपल्याला पहायला मिळतात. याला बरीच कारण आहेत, मात्र चहा हा त्या कारणांपैकी एक आहे. चहा पिल्याने हाडांच्या वेदनांना समोर जावे लागते. त्याचबरोबर दातांमध्ये ही पिवळेपणा देखील जाणवतो.

बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी चहा पितात. चहा बरोबर काहीच खात नाहीत. फक्त चहा पिल्याने पोटामध्ये गॅस तयार होतो. यामुळे पचनशक्ती मंदावते. तसेच पित्त निर्माण मळमळ होते आणि डोकेदुखीसारख्या समस्या जाणवतात.

रिकाम्या पोटी चहा पिल्यामुळे हृदयाची गती वाढते, हृदयाची धडधड वाढते. ज्यामुळे हृदयविकाराची समस्य निर्माण होण्याची शक्यता असते. चहा पिल्यामुळे काम करण्यास मूड येतो असे म्हटले जाते. परंतु, सकाळी दूधयुक्त चहा पिल्यामुळे दिवसभर थकवा येतो आणि कामात देखील चिडचिड होऊ लागते.

महत्त्वाच्या बातम्या-