सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

नवी दिल्ली | भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत वार्षिक 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या दिवाळीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोनं स्वस्त होईल, असा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता.

आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव 48 हजार रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

एचडीएफ सिक्युरिटीच्यानुसार रूपयाची घसरण हे त्याच्या मागचे कारण आहे. मागील व्यापारात दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव 46,887 रूपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीच्या किंमतीत सुद्धा आज वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आज दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 65 हजार प्रति किलो झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत तेजी नोंदवली गेली आणि ती 1856 डॉलर प्रति औंसवर पोहचली. तर चांदीचा दर चांदी 24.89 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली आहे.

सणासुदीच्या मुहुर्तावर गुंतवणुकदारांसाठी सध्या सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. अशातच आता आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठी घसरण अनुभवायला मिळाली आहे.

सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतंय.

2020 च्या सप्टेंबर तिमाहीत देशाची एकूण मागणी 94.6 टन होती. त्यामुळे या वर्षात मागणी वाढणार की नाही, हे सोन्याच्या दरावर अवलंबून आहे.

दरम्यान, सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

महत्त्वाच्या बातम्या – 

“कंगनाचा वरचा मजला रिकामा, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा”

  कर्णधारपद सोडल्यावर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…

  अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला पुन्हा मुंबई पोलिसांकडून अटक

  कचोरीसोबत कांदा न दिल्यामुळे तरुणीचा राडा, पाहा व्हिडीओ

  “2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”