मुंबई | भारताला 1947 मध्ये मोठ्या संयमाच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आहे. या लढ्यात क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र, या सर्वांच्या बलिदानाला भीक असं म्हणण्याचं धाडस बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केलं आहे.
एका कार्यक्रमात बोलताना कंगना राणावतने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारताला स्वातंत्र्य हे 1947 साली मिळालं नाही. भारताला 1947 साली भीक मिळाली होती, असं कंगनाने म्हटलं आहे.
भारताला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये मिळालं, असा जावई शोध कंगना राणावतने लावला आहे. देशात ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते, असंगी कंगना म्हणाली आहे.
मी ज्यावेळी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून बोलते, मी ज्यावेळी आपल्या संस्कृतीच्या रक्षणाविषयी बोलते, त्यावेळी मला भाजपसोबत जोडलं जातं, असंही कंगना म्हणाली आहे.
मी जे मांडले ते भाजपचे मुद्दे कसे काय असू शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असंही कंगना म्हणाली आहे. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने वक्तव्य केलं आहे. त्यावेळी तिने वादग्रस्त वक्तव्य देखील केलंय.
कंगनाच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कंगना राणावतला नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे आता कंगनाचा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी होताना दिसत आहे.
कंगनाच्या या वक्तव्याचा आता शिवसेनेने देखील निषेध व्यक्त केला आहे. शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी मागणी केली आहे.
कंगना राणावतने अतिशय बेजबाबदार, निराधार आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणारं वक्तव्य केलं आहे, असं म्हणत निलम गोऱ्हे यांनी कंगनाच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे.
प्रसिद्धीसाठी, वरचा मजला रिकामा असलेली कंगना राणावत बेताल वक्तव्य करणारी अभिनेत्री आहे, अशी टीका देखीस निलम गोऱ्हे यांनी केली आहे.
दरम्यान, कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील निलम गोऱ्हे यांनी केली आहे. शिवसेनेबरोबर आता राष्ट्रवादीने देखील कंगनाच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“संजय राऊत बोलून बोलून दमतात, त्यांना बॉर्नविटा पिण्याची गरज”
“एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जायचंय, पण भाजप कार्यकर्ते जाऊ देत नाहीत”
हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामशी; सलमान खुर्शिदांच्या पुस्तकावरून नवा वाद
“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”
फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर