राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; राज्यपालांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

मुंबई |छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (Shiv Jayanti 2022) निमित्ताने शिवसंग्राम (Shivsangram संघटनेकडून मुंबईत शिवाजी पार्क येथे (Mumbai) विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), आशिष शेलार (Ashish Shelar), राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

या कार्यक्रमात भाषण करताना दरेकर आणि रामदास आठवले यांनी ठाकरे सरकार विषयी नवी भविष्यवाणी केली. त्यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याबाबतचं एक नवी तारीख दिलीय जणू तसंच काहीसं वक्तव्य केलं. विशेष म्हणजे या वक्तव्यात राज्यपालांनी केलेलं वक्तव्य सध्या जास्त चर्चेला कारण ठरत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलं. राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबतही असेल, असं कोश्यारी यावेळी म्हणाले.

राज्यपालांच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. राज्यपाल नेमकं शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून हे म्हणाले? हा प्रश्न मात्र खरंच अनुत्तरीत राहिला आहे.

समजतात अनेक वाईट गोष्टी आहेत. त्याविरोधात संग्राम करावा लागेल. संग्राम प्रेमानेही करता येतो. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे आहेत असे नाही. अन्य राज्यातही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे माहीत आहे. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शक्ती कमी नव्हती पण शिवाजी महाराज यांच्याकडे शक्ती, भक्ती बरोबर युक्तीही होती, असं देखील ते म्हणालेत.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हे सरकार पडणार असल्याचं म्हणत वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या. त्यानंतर नुकतंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मार्च महिन्यात सरकार पडणार असल्याचा दावा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

“त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो तर धन्य झालो असतो” 

धनंजय मुंडेंची बॅटिंग पाहिली का?, 157च्या स्ट्राईक रेटनं खेचल्यात धावा; पाहा व्हिडीओ

“शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा, एप्रिलमध्ये वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा”

सीमेवर लढताना अवघ्या 23 व्या वर्षी सांगलीच्या सुपुत्राला वीरमरण; संपूर्ण देश हळहळला

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता कार्ड हरवलं तर…