१५ दिवसात अर्धी राष्ट्रवादी भाजपमध्ये आणणार; ‘या’ नेत्याचा दावा

अहमदनगर | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार चढाओढ सुरु झाली आहे. यातच अर्धी राष्ट्रवादी भाजपमध्ये आणणार, असा दावा पंचायत समिती सदस्य भगवान मुरुमकर यांनी केला आहे.

भगवान मुरुमकर राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. या अफवा असल्याचं स्पष्ट करत मुरुमकर यांनी आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मी भाजपमध्येच असून येत्या काळात मंत्री राम शिंदे यांचं काम करणार आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी माझ्यासंदर्भात अफवा पसरवायला सुरुवात केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

आता भाजपमधून कुणीही राष्ट्रवादीत जाणार नाही. मात्र राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत. १५ दिवसात राष्ट्रवादी रिकामी करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, मागच्या काही दिवसात कर्जत-जामखेडमध्ये भाजपमधल्या बऱ्याच नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-