“अरे हाड, वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे, हमने उनको धक्काबुक्की किया!”

मुंबई | विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या फार चर्चेत आहे. एक म्हणजे विधानसभेत विरोधी आणि सत्ताधारी यांच्यात वाद सुरु आहेत आणि दुसरीकडे विधानसभेच्या बाहेर पायऱ्यांवर मारामाऱ्या सुरु आहेत.

गद्दार आणि पन्नास खोके या घोषणा आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा देण्यात आल्या. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण  होते. त्याचा परिणाम शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात धक्काबुक्की पहायला मिळाली.

शिवसेनेचे बंडखोर नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी याप्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी हिंदी भाषेत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी या धक्काबुक्कीवर भाष्य केले आणि विरोधकांना धुडकावले.

पत्रकारांनी त्यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले, “अरे हाड, वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे, हमने उनको धक्काबुक्की किया” असे विधान त्यांंनी करताच पत्रकारांमध्ये हशा पिकला आणि तणावाचे वातावरण निवळले.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असता, सुरुवातीला शाब्दिक आणि नंतर त्याचे रुपांतर अंगावर धाऊन जाण्यात झाल्याने धक्काबुक्की झाली.

या प्रकराचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, गद्दार आणि पन्नास खोके हे शब्द त्यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी हा प्रकार केला.

दरम्यान, आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, तेव्हा आमच्या अंगावर देखील कोणी येऊ नये, आमचा नाद करायच नाही, असा इशारा भरत गोगावले यांनी विरोधी पक्षांना दिला.

महत्वाच्या बातम्या – 

“आम्ही काही केलं की तो घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं…” धनजंय मुंडे यांची विधानसभेत बॅटिंग

शिंदे गट कमळावर निवडणुका लढणार? वाचा सविस्तर

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत मारामारी; नेमके कारण जाणून घ्या

टोलनाके होणार हद्दपार, टोलवसुलीसाठी नितीन गडकरींना आणली आहे नवीन योजना, जाणून घ्या उपयुक्त माहिती

तरुणींच्या धर्मांतरासाठी ‘दरपत्रक’; आमदार नितेश राणेंनी विधानसभेत सादर केली खळबळजनक माहिती