मुंबई | विधानसभेत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यात विधानसभेत वेगळा आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर वेगळा असे दोन गोंधळ सुरु आहेत. त्यात दोनहीकडील सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांवर तुटून पडत आहेत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपविरोधात घोषणा देत आहेत. पन्नास खोके आणि गद्दार म्हणून ते त्यांना चिडवत आहेत. त्याचे पडसाद विधानसभेत उमटत आहेत.
सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढविला आहे.
“आम्ही काही केलं की तो घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं की ते शॉपिंग”? असा प्रश्न त्यांना सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली.
एकनाथ शिंदे आपल्यासोबत 40 आमदारांना घेऊन गेले आणि ते मुख्यमंत्री झाले. रिक्षावाला पासून राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांनी प्रवास केला. त्यांचे नगरसेवक देखील चाहते झाले आहेत.
परंतु ज्यावेळी नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असे ठरले, त्यावेळी हेच त्यांचे चाहते त्यांच्यावर नाराज झाले. शिंदे यांच्या या निर्णयावर त्यांचे नगरसेवक नाराज झाले, असे मुंडे म्हणाले.
एवढा आटापिटा करुन भाजपला काय मिळाले, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले. ते कमीत कमी संविधानिक विरोधी पक्षनेते पदावर होते. पण आता ते असंविधानिक उपमुख्यमंत्री पदावर आहेत. आता मुख्यमंत्री देखील जनतेतून होऊ द्या, अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या –
शिंदे गट कमळावर निवडणुका लढणार? वाचा सविस्तर
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत मारामारी; नेमके कारण जाणून घ्या
टोलनाके होणार हद्दपार, टोलवसुलीसाठी नितीन गडकरींना आणली आहे नवीन योजना, जाणून घ्या उपयुक्त माहिती
तरुणींच्या धर्मांतरासाठी ‘दरपत्रक’; आमदार नितेश राणेंनी विधानसभेत सादर केली खळबळजनक माहिती
“शरद पवारांना उशिरा कंठ फूटला, त्यांचे आणि राऊतांचे संबंध म्हणजे…”, अतुल भातखळकरांची पवारांवर टीका