मुंबई | काल विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) अखेरचा दिवस होता. चार दिवसीय अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण घडामोडी झाल्या. यात आरोपांच्या फैरी झडल्या आणि वाद देखील मोठ्या प्रमाणात गाजले.
विरोधी पक्षांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षांंना आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला डिवचणाऱ्या घोषणा दिल्या. पन्नास खोके एकदम ओके, आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
त्याचा बदला म्हणून सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी देखील शिवसेना आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांना फ्लेक्स दाखवत त्यावर मजकूर लिहिला होता.
त्यावरुन आता वाद चिघळला आहे. यावेळी ‘आदित्य ठाकरे यांची दिशा चुकली’ असा मजकूराचे फ्लेक्स भाजप आणि शिंदे गटाने झळकावले. या वादावरुन आता तर्क वितर्क लावले जात आहेत.
त्यावरुन शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आदित्य ठाकरे यांची दिशा चुकली म्हणजे, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेले हे त्यांचे चुकले, असे गोगावले म्हणाले.
त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत न जाता, भाजपसोबत नैसर्गिक युती करायला हवी होती, असे गोगावले म्हणाले. गेले दोन अडीच वर्षे हे लोक आम्हाला कमी करत चालले होते, असे देखील गोगावले म्हणाले.
तसेच दिशा या शब्दाचा अर्थ दिशा पटनीसोबत आहे का, असा प्रश्न विचारला असता, गोगावले म्हणाले, दिशा पटनी वैगरे कोणी आम्हाला माहित नाही. त्यांच्या खाजगी जीवनावर आम्ही काही बोलणार नाही.
महत्वाच्या बातम्या –
पाषाण तलाव परिसरात आणि उद्यानात प्रेमी युगुलांना बंदी; जाणून घ्या कारण
आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली कविता
“पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर…” उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
मराठा आरक्षणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वाद; वाचा इतिवृत्त
IPS कृष्ण प्रकाश यांची आईच्या निधनावर भावूक पोस्ट “तुझ्याशिवाय मी काहीच नाही”