नवी दिल्ली | देशात राजकीय वारे जोरात वाहत आहेत. गेल्या महिन्याभरात देशातील दोन राज्यांची सत्तांतरे झाली. महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीत असलेले मविआ सरकार कोसळले.
तर बिहार मध्ये नितीश कुमारांनी (Nitish Kumar) महागठबंधन करत काँग्रेस (INC) आणि राजदच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. दरम्यान, गेले काही दिवस काँग्रेस नव्या अध्यक्षांच्या निवडणूक धामधुमीत आहे.
त्यातच आता काँग्रेसला मोठा झटका मिळाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद (Ghulam Nabi Azad)यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. गुलाम नबी आजाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
16 ऑगस्ट रोजी त्यांनी जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) काँग्रेस प्रचार समिती प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांची नाराजी उघड झाली होती. त्यामुळे अखेर त्यांनी राजीनामा देत आपल्या भूमिकेला पूर्णविराम दिला आहे.
आझादांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना चार पानी पत्र देत राजीनामा दिला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 2013 साली राजकारणात प्रवेश केल्यानंतर पक्षाची सल्लागार यंत्रणा बरखास्त करण्यात आली, असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.
त्याचबरोबर पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला काढून कोणताही अनुभव नसणाऱ्या लोकांना पक्षाचे कामकाज चालवू देण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे. यावेळी त्यांनी लोकसभेत राहुल गांधी यांनी पक्षाचा अध्यादेश फाडल्याचे देखील पत्रात नमुद केले.
गुलाम नबी आझाद हे पक्षाचे दिग्गज नेते आणि जम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या राजीनाम्याने पक्षाला मोठा नेता गमवावा लागला आहे. त्यांनी पक्ष बांधणीची अनेक कामे केली आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’ या घोषणेमागील ‘दिशा’ कोण? भरत गोगावले म्हणाले,
पाषाण तलाव परिसरात आणि उद्यानात प्रेमी युगुलांना बंदी; जाणून घ्या कारण
आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली कविता
“पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर…” उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
मराठा आरक्षणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वाद; वाचा इतिवृत्त