Bharat Ratna Award l लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर! मात्र भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो

Bharat Ratna Award l भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ट्विटरवर पीएम म्हणाले की, “श्री लालकृष्ण अडवाणी जी यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. (Bharat Ratna to Lal Krishna Advani)

पण तुम्हाला हे माहित आहे का भारतरत्न हा पुरस्कार नेमका कोणाला दिला जातो? या पुरस्कारांमध्ये नेमकं काय दिल जात? यासह पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता? याबाबत आपण आज सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

Bharat Ratna Award l भारतरत्न पुरस्कार प्रथम कोणाला मिळाला?

भारतातील पहिला भारतरत्न पुरस्कार स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांना प्रदान करण्यात आला होता.

या तिघांना देखील भारत सरकारने 1954 मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला होता. त्यामुळे अगदी तेव्हापासूनच आजपर्यंत अनेकांना आपापल्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो.

भारतरत्न पुरस्कारांमध्ये काय मिळते? (Bharat Ratna Award) :

भारत सरकार भारतरत्न पुरस्कार प्रदान करणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करत असते. मात्र देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानासह कोणतीही रक्कम दिली जात नाही. मात्र भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला सरकारी विभाग सुविधा दिल्या जातात. उदाहरणार्थ, भारतरत्न पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला रेल्वेकडून मोफत प्रवास सुविधा मिळते. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीलाही महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रणे मिळतात. (Bharat Ratna Award)

यासोबतच भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेन्सीमध्ये स्थान देत असते. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान यांच्यानंतर प्रोटोकॉलमध्ये भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींचा क्रमांक लागतो.

Bharat Ratna Award l भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळतो:

राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रातील कोणत्याही विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवकाला भारत सरकारकडून हा सन्मान दिला जातो.

भारतरत्न पदकामध्ये तांब्यापासून बनवलेल्या पिंपळाच्या पानावर प्लॅटिनमचा चमकणारा सूर्य असतो. या पानाची धारही प्लॅटिनमची देखील असते. तसेच त्याच्या खाली हिंदीमध्ये चांदीमध्ये भारतरत्न लिहिले असते. तर त्याच्या मागील बाजूस अशोक स्तंभाच्या खाली हिंदीत सत्यमेव जयते लिहिलेले आहे.

News Title : Bharat Ratna to Lal Krishna Advani

महत्वाच्या बातम्या – 

Poonam Pandey Alive l अभिनेत्री पूनम पांडे जिवंत! यामुळे तिने केला हा स्टंट

Valentine Week 2024 l प्रेमींनो… व्हॅलेंटाईन वीक येतोय? त्याआधी जाणून घ्या 7 दिवसांचे महत्त्व

Government security to Manoj Jarange Patil l मनोज जरांगे पाटील यांना सरकारी सुरक्षा; सुरक्षेबाबतचे कारण आले समोर

Business Idea l तुम्ही स्वतःचा हा व्यवसाय सुरू करा आणि बक्कळ पैसा कमवा

NIACL Bharti 2024 l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर