Poonam Pandey Alive l काल (2 फेब्रु 2024) पूनम पांडेच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. तिच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने झाल्याचे म्हटले होते. त्यांच्या पीआर टीमने देखील पूनमच्या मृत्यूची पुष्टी केली होती. मात्र यासंदर्भात एक मोठी बातमी समोर (Poonam Pandey) आली आहे. आज अखेर अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. अभिनेत्री पूनम पांडेने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून ती जिवंत असल्याचा खुलासा केला आहे. तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला नसल्याचे तिने व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. (Poonam Pandey)
Poonam Pandey Alive l चाहत्यांनो पूनम पांडे जिवंत आहे :
अखेर पूनम पांडे मृत नसून जिवंत असल्याचे समोर आले आहे. आज अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या जगण्याची पुष्टी केली आणि तिने तिच्या मृत्यूची खोटी बातमी का पसरवली हे देखील उघड केले आहे. पूनम पांडेने (Poonam Pandey) व्हिडिओ शेअर केल्यानंतर एक कॅप्टिव दिले आहे. यामध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, “मला तुम्हा सर्वांसोबत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मी इथे आहे, मी जिवंत आहे.गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मला मारले नाही, परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की या रोगाचा सामना कसा करायचा हे माहित नसलेल्या हजारो महिलांचे प्राण घेतले आहेत.
इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचाव करणे शक्य आहे. यासाठी एचपीव्ही लस आणि लवकर ओळख चाचणी या मुख्य आहेत. या आजाराने कोणाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे.
चला गंभीर जागरूकतेने एकमेकांना सशक्त करूया आणि प्रत्येक स्त्रीला माहिती दिली जाईल याची खात्री करा. काय केले जाऊ शकते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. चला या आजाराचे घातक परिणाम दूर करण्याचा प्रयत्न करूया असे तिने कॅपेंशनद्वारे सांगितले आहे. (Poonam Pandey)
Poonam Pandey Alive l व्हिडीओमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ :
मात्र अभिनेत्री पूनम पांडेच्या या निधनामुळे तिच्या चात्यांना मोठा धक्काच बसला होता. मात्र अशातच आता तिने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळच उडाली आहे. मात्र गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी अभिनेत्री पूनम पांडेने केले गेले असल्याचे सांगितले जात आहे.
News Title : Poonam Pandey Alive
महत्वाच्या बातम्या –
Valentine Week 2024 l प्रेमींनो… व्हॅलेंटाईन वीक येतोय? त्याआधी जाणून घ्या 7 दिवसांचे महत्त्व
Business Idea l तुम्ही स्वतःचा हा व्यवसाय सुरू करा आणि बक्कळ पैसा कमवा
NIACL Bharti 2024 l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर
Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे रखडलेली जमिनीची कामे मार्गी लागतील