“केंद्र समर्पित भावनेनं काम करतं, राज्य सरकारकडे मात्र सहकार्याची भावना नाही”

मुंबई | केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशातील वातावरण चांगलच तापलं. या योजनेविरोधात काढलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

उत्तर भारतात अग्निपथ योजनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर विरोधकांनी देखील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

देशातील वातावरण तापलं असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्राच्या विविध योजनांवर भाष्य केलं आहे. तर भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवूनच केंद्र सरकारने योजना बनवल्या असल्याचं भारती पवार यांनी सांगितलं. तर केंद्र सरकारने आठ वर्षात विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत, असंही भारती पवार म्हणाल्या.

देवळा येथील एका कार्यक्रमात बोलत असताना भारती पवार यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. केंद्र सरकार शेतकरी व जनतेसाठी समर्पित भावनेने काम करत आहे. मात्र, राज्य सरकारकडे सहकार्याची भावना नाही, असा टोला भारती पवार यांनी लगावला आहे.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश सशक्ततेच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहे, असं वक्तव्यही भारती पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, सध्या देशाच्या राजकारणात अनेक मुद्दे गाजत असताना अग्निपथ योजनेवरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विधानपरिषद निवडणुकीपुर्वी एकनाथ खडसे आणि राम शिंदेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘या’ कारणामुळे साजरा करतात फादर्स डे, वाचा महत्त्व आणि इतिहास

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ, गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

“10 तारखेला महाविकास आघाडीच्या पत्त्याचा बंगला हलला, आता 20 तारखेला कोसळणार”